दुसरा दिवस : 7 जानेवारी 22

 आज गट क्रमांक १ साठी भोवड वाडी येथे अभ्यासविषयक गृहभेटी घेतल्या. त्यावेळी गटातील सर्व मुलांना मार्गदर्शन केले त्यांचा अभ्यास तपासला. दयासागरा ही प्रार्थना घेतली. गणित विषयक मार्गदर्शन केले. समप्रमाणावर आधारित म्हणजेच Direct Proportion वर आधारित भागावर उदाहरणे घेतली. तसेच विज्ञान पाठ्यपुस्तकातील Changes  : Physical and Chemical  या पाठावर सविस्तर उदाहरणांसह मार्गदर्शन केले. त्याच्यावरील स्वाध्याय लिहिण्यास सांगितला. गुणाकाराची उदाहरणे घेतली. केशवा माधवा हे भक्तीगीत श्रुतलेखनासाठी घेतले. त्यानंतर त्या गीताचे सामूहिक गीतगायन घेतले. अभ्यास तपासण्यात आला.






Comments