1️⃣रोहिले कोणाला म्हणत ? अफगाणिस्तानातून आलेल्या पठाणांना रोहिले म्हणत. 2️⃣ अहमदशाह अब्दालीने मराठयांना चौथाईचा हक्क का दिला ? मराठ्यांमुळेच अब्दालीचे संकट टळले. म्हणून अब्दालीने मराठ्यांना मुघलांच्या सुभ्यामधील चौथाईचा हक्क दिला. 3️⃣ मराठ्यांनी अब्दालीबरोबर झालेल्या करारात काय मान्य केले ? मराठ्यांनी रोहिले, जाट , राजपूत , अफगाण इत्यादी शत्रूंपासून मुघल सत्तेचे रक्षण करण्याचे मान्य केले. 4️⃣ मुघलांच्या सुभ्यामध्ये कोणाचा समावेश होता ? मुघलांच्या सुभ्यामध्ये काबूल , कंदाहार आणि पेशावर यांचा समावेश होता. 5️⃣ दत्ताजी व अब्दाली यांची लढाई कोठे झाली ? दत्ताजी व अब्दाली यांची लढाई यमुनेच्या तीरावर बुराडी घाट येथे झाली. 6️⃣ सदाशिवरावभाऊ कोण होता ? सदाशिवरावभाऊ हा चिमाजीआप्पा यांचा मुलगा होता. 7️⃣ सदाशिवरावभाऊ यांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता ? इब्राहिमखान गारदी हा सदाशिवरावभाऊ यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता. 8️⃣ पानिपतची तिसरी लढाई केव्हा झाली ? १४ जानेवारी १७६१ मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. 9️⃣ पेशवा माधवराव याने निजामाला कोठे पराभूत केले ? पेशवा माधवराव याने निजामाला पैठणजवळील र...