राष्ट्ररक्षक मराठे
1️⃣रोहिले कोणाला म्हणत ?
अफगाणिस्तानातून आलेल्या पठाणांना रोहिले म्हणत.
2️⃣ अहमदशाह अब्दालीने मराठयांना चौथाईचा हक्क का दिला ?
मराठ्यांमुळेच अब्दालीचे संकट टळले. म्हणून अब्दालीने मराठ्यांना मुघलांच्या सुभ्यामधील चौथाईचा हक्क दिला.
3️⃣ मराठ्यांनी अब्दालीबरोबर झालेल्या करारात काय मान्य केले ?
मराठ्यांनी रोहिले, जाट , राजपूत , अफगाण इत्यादी शत्रूंपासून मुघल सत्तेचे रक्षण करण्याचे मान्य केले.
4️⃣ मुघलांच्या सुभ्यामध्ये कोणाचा समावेश होता ?
मुघलांच्या सुभ्यामध्ये काबूल , कंदाहार आणि पेशावर यांचा समावेश होता.
5️⃣ दत्ताजी व अब्दाली यांची लढाई कोठे झाली ?
दत्ताजी व अब्दाली यांची लढाई यमुनेच्या तीरावर बुराडी घाट येथे झाली.
6️⃣ सदाशिवरावभाऊ कोण होता ?
सदाशिवरावभाऊ हा चिमाजीआप्पा यांचा मुलगा होता.
7️⃣ सदाशिवरावभाऊ यांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता ?
इब्राहिमखान गारदी हा सदाशिवरावभाऊ यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता.
8️⃣ पानिपतची तिसरी लढाई केव्हा झाली ?
१४ जानेवारी १७६१ मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली.
9️⃣ पेशवा माधवराव याने निजामाला कोठे पराभूत केले ?
पेशवा माधवराव याने निजामाला पैठणजवळील राक्षसभुवन येथे पराभूत केले.
🔟 मराठ्यांच्या इतिहासात माधवराव पेशव्यांचा उल्लेख कसा केला जातो ?
मराठ्यांच्या इतिहासात एक प्रामाणिक , कष्टाळू , जिद्दीचा आणि लोकहितदक्ष असा शासक म्हणून माधवराव पेशव्यांचा उल्लेख केला जातो.
Comments
Post a Comment