🟣 सर्व पालकांसाठी व सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना
🔵 आजपासून शाळा नाही
मा.जिल्हाधिकारी व मा. शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या लेखी आदेशानुसार दिनांक 6 जानेवारी 2022 पासून कोरोना / ओमायक्रॉन साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
त्यामुळे शिडवणे नं. १ शाळेतील पहिली ते सातवीच्या सर्व मुलांनी शाळेत येऊ नये. शाळा बंद असली तरी शाळेतील सर्व शिक्षक व इतर कर्मचारी शाळेत पूर्ण वेळ असणार आहेत.
त्यावेळी शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणार आहेत. ज्या मुलांना ऑनलाईन शिकवणे शक्य नसेल त्यांना पूर्वीप्रमाणे गृहभेटीद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे.
आपल्या पालकांच्या Whats app ग्रुपवर आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख देखील असणार आहेत. अभ्यासबाबतच्या सर्व अद्ययावत सूचना वर्गांच्या ग्रुपवर व कॉमन ग्रुपवर नियमितपणे देण्यात येतील.
सर्व मुलांनी घरी राहून अभ्यास करावयाचा आहे. शाळेत यायचे नसले तरी शिक्षण प्रक्रिया सुरुच असणार आहे. तरी सर्व मुलांनी व पालकांनी नियमितपणे सूचना वाचाव्यात व त्याप्रमाणे शिक्षण प्रक्रियेमध्ये राहावे. ज्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचला नसेल असे आपणांस वाटत असेल तर तुमच्यामार्फत त्यांना कळविण्यास नम्र विनंती आहे.
🟣 मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं.१
Comments
Post a Comment